अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणार्या नागरिकांकडून शंभर रुपये दंड आकारले जात आहे.
मात्र एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत नागरिकांकडून मनमानीपणे पाचशे ते हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात येत असल्याचा आरोप मनसेचे नगर तालुका उपप्रमुख बाळासाहेब ढवळे यांनी केला आहे.
तर नागरिकांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना अवाजवी दंड वसूल करु नये, तसेच दंडात्मक कारवाईच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळणार्या पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सर्वसामान्यांकडून होणारी अवाजवी दंडात्मक कारवाई येत्या चार दिवसात न थांबविल्यास पोलीस अधिक्षक कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सदर मागण्यांचे निवेदन ढवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालयात दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, विना मास्क फिरणार्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शंभर रुपयाचा दंड करणे अपेक्षित आहे.
मात्र विना मास्क आढळल्याने शंभर रुपयाचे दंड भरण्याची तयारी दर्शवली. मात्र एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल आव्हाड यांनी पाचशे ते हजार रुपये पर्यंत दंड भरण्याचे सांगितले.
एवढा दंड भरण्यास असमर्थता दर्शविल्याने त्यांनी दोनचाकी गाडी ताब्यात घेतली. अशा पध्दतीने अवाजवीपणे दंडात्मक कारवाई करुन सर्वसामान्य नागरिकांना लुटले जात आहे.
कोरोना महामारीत अनेकांचा रोजगार बुडाला असताना आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अशा पध्दतीने दंडात्मक कारवाई करुन सर्वसामान्यांवर अन्याय केला जात असल्याचे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved