नागरिकांना आत्मिक शांती गरजेची , धार्मिक स्थळे सुरू करा’ !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :   लॉकडाऊन सुरु झाल्यापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थितीत आता बदल होत आहे. शासनातर्फेही टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे.

आजच्या परिस्थितीत नागरिकांना आत्मिक शांती गरजेची आहे. शासनाने धार्मिक स्थळे पुन्हा उघडण्यास परवानगी द्यावी. यासाठी कडक नियमावली करावी, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही,

अशी मागणी अहमदनगर सोशल फाउंडेशन ट्रस्टचे व्यवस्थापक नईम सरदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ई-मेलद्वारे पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धार्मिकस्थळे सुरु करण्यास शासनाने परवानगी देऊन सामाजिक अंतर व खबरदारी बाबतचे सर्व कडक नियम पाळण्याची जवाबदारी संबंधित ट्रस्टवर सोपवली तर ते कर्तव्य म्हणून ही जबाबदारी पार पाडतील, असे नमूद केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24