अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- काेपरगाव तालुक्यात बुधवारी दुपारी २० जणांच्या नमुन्याची रॅपिड अॅण्टिजेन चाचणी केली. यात ८ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आठ पॉझिटिव्ह रुग्णांत लक्ष्मीनगर दोन पुरुष, कोळपेवाडी एक तरुण, शिंदे शिंगीनगर एक पुरुष व एक महिला, स्वामी समर्थ नगर ३ रुग्ण यात एक पुरुष दोन महिला
यांचा समावेश असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. बुधवारी दुपारी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील २० संशयितांचे नमुने रॅपिड अॅण्टिजेन चाचणीद्वारे तपासण्यात आले.
यात ८ जण नवे रुग्ण आढळून आले, तर उर्वरित १२ अहवाल निगेटिव्ह आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे, कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर,
विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, लोकांनी काम असेल, तरच घराबाहेर पडावे. नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com