अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात नुकताच तीन ठिकाणी चोरी केल्यानंतर आता शनिवारी चोरट्यांनी पुन्हा धूम स्टाईलने एकदा चोरी केली आहे .
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भरदुपारी प्रोफेसर कॉलनी रस्त्यावरील रेणुका माता मंदिर जवळ वैशाली विलास देशपांडे (वय ६० रा. प्रोफेसर कॉलनी रोड ) या महिलेचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले आहे .
याबाबत अधिक माहिती अशी कि, वैशाली व त्याचे पती विलास देशपांडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेले.
या प्रकरणी वैशाली विलास देशपांडे यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक रवींद्र पिंगळे करत आहे .