अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : ‘त्या’ आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांचे जेलभरो आंदोलन

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : श्रीरामपूर हरेगाव येथील अमानुषपणे मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी नाना गलांडे याला त्वरित अटक करून आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईच्या मागणीसाठी रिपाई व भिमशक्तीच्या वतीने काल मंगळवारी येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले.

यावेळी रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभूवन, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली येथील रेल्वे स्टेशनजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान रिपाई व भिमशक्तीचे पदाधिकारी, पीडित कुटुंब तसेच सर्व कार्यकर्ते जमा होऊन घोषणा यावेळी देण्यात आल्या.

याप्रसंगी पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी, पोलीस उपनिरिक्षक सुरेश आव्हाड, पोलीस उपनिरिक्षक संजय निकम, गोपीनयचे सोमनाथ गाडेकर, नितीन सोनवणे आदींनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवून शहर पोलीस स्टेशनला नेऊन अटक करून नंतर त्यांची सुटका केली.

यावेळी राजेंद्र मगर, संजय बोरगे, सनी बारसे, गुड्डू पंडित, विजय माघाडे, प्रदीप थोरात, शुभ माघाडे, मोजेस चक्रनारायण, सुमेध पडवळ, अर्जुन शेजवळ, शुभम लोळगे, सचिन खांडरे, बाप्पू विधाटे, आबा पंडित, रमेश कांबळे,

हरिभाऊ बारसे, विशाल सुरडकर, तुषार पारधे, आबासाहेब औताडे, सुमित विघावे, अनिल गांगुर्डे, यासीन सय्यद, अनिस शेख, प्रमोद जाधव, विजय माघाडे, तनवीर शेख, महिला आघाडीच्या विजया बारसे, कल्पना तेलोरे, वंदना गायकवाड आदी रिपाइं व भिमशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office