अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : प्रवरा परिसरात वाढता कोरोनाचा प्रसार पाहताना नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करणे, तसेच कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रवरा परिसरातील लोणी, कोल्हार, चंद्रापूर, दाढ येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर तसेच परिसरातील एका बँकेतील एक व एका खाजगी क्लास चालकाला कोरोना झाल्याचे आढळून आल्यामुळे कोरोनाचे प्रसार मोठ्या प्रमाणावर होत
असल्याचे दिसत आहे. यामुळे डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रक काढून परिसरातील नागरिकांना पुढील काही दिवस काळजी घेणे व शासकीय सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
यामुळे प्रवरा परिसरातील नागरिकांनी नियमित मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे,
तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधे घेणे अशा उपाय योजना कराव्यात , तसेच जर ताप किंवा खोकला असेल
तर जवळच्या आरोग्य सेवा केंद्रात डॉक्टरांशी संपर्क करावा, असे आवाहन डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकाद्वारे केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews