अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महिला शिक्षणासाठी अमुलाग्र काम केलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने “क्रांतिज्योती महिला सन्मान सोहळ्याचे” रविवार दि. ३ जानेवारीला आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
या सोहळ्यामध्ये नगर शहरातील शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलेल्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी तीन वाजता पक्षाच्या कालिका प्राईड येथील कार्यालयामध्ये हा सोहळा पार पडणार आहे.
यावेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती असणार आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या संकल्पनेतून पार पडणाऱ्या या विशेष सोहळ्याच्या आयोजनासाठी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली महिला काँग्रेस,
शिक्षक काँग्रेसने विशेष पुढाकार घेतला आहे. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शहर जिल्हा काँग्रेसचे प्रा.डॉ.बाळासाहेब पवार, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद शिंदे,
नलिनी गायकवाड, उषाकिरण चव्हाण, सुनिता बागडे, रवी चांदेकर, उषा भगत, कौसर खान, उमेश शिंदे, नीता बर्वे, शाहीन बागवान, जरिना पठाण, जाहिदा शेख, नितीन शेलार आदी परिश्रम घेत आहेत.