शहर राष्ट्रवादीच्या वतीने दिल्लीच्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-शेतकरीविरोधी असलेल्या तीन नव्या कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.

आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंगळवार दि. 8 डिसेंबर भारत बंद मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी दिली.

टाळेबंदी काळात शेतकरी विरोधात केलेल्या कायद्यामुळे देशातील शेतकर्‍यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. हे काळे कायदे रद्द होण्यासाठी सर्व शेतकरी एकवटले असून,

त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत मंगळवारचा देशव्यापी संप यशस्वी करण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर शेतकरी विरोधी काळे कायदे केंद्र सरकारने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24