अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-काटवन खंडोबा रोड येथील साई कॉलनीचा एक वर्षापासून असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रलंबीत प्रश्न नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मंगलाताई लोखंडे व परेश लोखंडे यांनी सोडविल्याबद्दल त्यांचा स्थानिक नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी साई कॉलनीचे अध्यक्ष वैभव चव्हाण, अनिल दारकुंडे, संतोष दारकुंडे, जयश्री दारकुंडे, मंदा वाळके, संगीता दारकुंडे, वैभव चव्हाण, बंटी भिंगारदिवे, हेमंत महाराज, रोहन कानडे, अविनाश वाळके, आदिल बागवान, हरीश चव्हाण, वाजिद शेख, सद्दाम शेख, सुनील आकसाळ, हर्षल म्हस्के, सुनील झुंगे आदी उपस्थित होते.
माळीवाडा भागात राहणारे वीस कुटुंब काटवन खंडोबा येथील साई कॉलनी येथे राहण्यास आले आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. फेज टू ची लाइन टाकण्यात आली होती. पण ती जोडलेली नसल्याने या भागात पिण्याच्या पाण्यासाठी रहिवासींना आजूबाजूच्या परिसरात पाण्याची भटकंती करावी लागत होती.
सदर प्रश्न स्थानिक नागरिकांनी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मंगलताई लोखंडे व परेश लोखंडे यांच्या समोर मांडला असता त्यांनी महापालिकेच्या अधिकार्यांशी पाठपुरावा करुन सदर प्रश्न सोडविला आहे. पाण्याचा प्रश्न सुटल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved