Ahmednagar News : तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी, सह. दुय्यम निबंधकासह ३२ इसमांविरुद्धही गुन्हा दाखल नगर शहराजवळील वडगाव शिवारातील गट नंबर २०३ मधील क्षेत्र २ हेक्टर ९७ आर, पोटखराबा ०.०९ आर.,
गट नं. २०५ एकूण क्षेत्र १ हे. ३४ आर ही कनिष्ठ महार बतन हाडोळा इनाम वर्ग ६ ब ची जमिन जुन्या शर्तीवर करण्यासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याप्रकरणी नगरचे तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार,
मंडल अधिकारी, तलाठी यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे सदरील जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार बेकायदेशीर करून दिल्या प्रकरणी सह. दुय्यम निबंधक यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तसेच जमिनीचे भोगवाटदार, संमती देणारे व घेणाऱ्यासह ३२ जणांविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. सदरील जमिनीचा व्यवहार बेकायदेशीर झाल्याची तक्रार नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक ( अँन्टीकरप्शन) कडे प्राप्त झाल्यानंतर ‘ही कारवाई करण्यात आली.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ ‘च्या कलम १३ (१) (ड) सह १३ (२) सह भादविकच्या १६७, ४२०, १०९ प्रमाणे ९९ जुलै रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी व्ही. टी. जरे,
तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुठे, तत्कालिन तहसिलदार एल. एन. ‘पाटील, तत्कालिन मंडल अधिकारी दुर्गे, तलाठी एल. एस. रोहोकले, तत्कालिन सह. दुय्यम निबंधक दिलीप निराली या अधिकाऱ्यांचा गुन्हा दाखल झाल्यामध्ये समावेश आहे.
तसेच ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला त्या जमिनीच्या भोगवाटदारांची नावे पुढीलप्रमाणे आहे. दिनकर आनंदा शिंदे, विनायक शंकर शिंदे, बाबु आनंदराव शिंदे, मोहन आनंदराव शिंदे, वामन किसन शिंदे, यादव किसन शिंदे, सदाशिव केशव शिंदे, रामभाऊ केशव शिंदे, सुनिल केशव शिंदे,
यादव केशव शिंदे, मालनबाई केशव शिंदे, लता शांतवन भाकरे, अरुण दगडू शिंदे,शालनबाई दगडू शिंदे, लक्ष्मण रामचंद्र शिंदे, मथुरा विष्णु शिंदे, संदिप विष्णु शिंदे, सुनिता रतन गायकवाड, नंदा शाम घाटविसावे, शालुबाई शाहुराव प्रभुणे, मच्छिंद्र आनंदराव शिंदे,
लिलाबाई चंद्रभान पाडळे ब शोभा बुद्धीराम ठाकूर. त्याचप्रमाणे ज्यांनी संमती दिली त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. त्यात वच्छलाबाई तुकाराम पाचारणे, सुशिला शांतवन घाटविसावे, तुळसाबाई मारूती नरवडे, छबुबाई भिवाजी साळवे,
इंद्रायणी विठ्ठल जाधव, वत्सला वामन जाधव, कौशल्या दामु जगताप यांचे जनरल मुखत्यार उत्कृष सुरेश पाटील व जमिन खरेदी करणारे अजित कचरूदास लुंकड यांचा समावेश आहे. या घटनेचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक प्रविण लोखंडे हे करत आहेत. दरम्यान जमिन खरेदी व्यवहारप्रकरणी अधिकारी, भोगवाटदार, संमती देणारे तसेच घेणारे अडकल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.