अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-एनसीसी महानिदेशक नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार व 17 महाराष्ट्र बटालियन अहमदनगरच्या स्वच्छता पंधरवाडा नियोजित कार्यक्रमानुसार अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर एनसीसी विभागाने स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.
संपूर्ण देशभरात 1 ते 15 डिसेंबर या कालावधी स्वच्छता पंधरवाडा म्हणून साजरा होत आहे. प्राचार्य डॉ.आर.जे बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. एम.एस.जाधव यांनी स्वच्छता मोहिमेचे नियोजन केले. यावेळी प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस म्हणाले, अशा उक्रमाची पर्यावरण व आरोग्यासाठी नितांत गरज आहे.
या उपक्रमातून एनसीसी छात्रांमध्ये स्वच्छतेचा संस्कार रुजेल आणि त्याचा दीर्घकालीन फायदा कुटुंब,समाज आणि देशाला होईल. कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून 17 महारष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट पी. व्यंकटेशन उपस्थित होते.
पी. व्यंकटेशन व डॉ.एम.एस. जाधव यांनी छात्रांना मार्गदर्शन केले. लेफ्टनंट एम.एस. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील, 17 महाराष्ट्र बाटलीन प्रवेशद्वार, एनसीसी परेड मैदान, बाटलीन व बँक परिसर इ. ठिकाणी स्वच्छता केली. एनसीसीच्या 86 छात्रांनी या मोहिमेत उत्साहाने सहभाग नोंदवून स्वच्छतेसाठी मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमाचे 17 महाराष्ट्र बटालियनचे सीईओ कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली यांनी एनसीसी छात्रांचे कौतुक केले. या मोहिमेसाठी बाटलीनमधील पी.आय. स्टाफ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचलन आभार डॉ.एम एस जाधव यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.नागवडे, डॉ.गायकर, डॉ.रझाक व रजिस्टर बळीद यांचे सहकार्य लाभले.