अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील एकूण ११५ गावे आहेत. दि.१० मार्च २०२० पासून श्रीगोंदे तालुक्यात रुग्णांच्या चाचण्या चालू झाल्या. दि. २ सप्टेंबर २०२० रोजी ११५ पैकी ७२ गावांमध्ये एकूण ८६९ कोविड-१९ चे रुग्ण आढळून आले.
तालुक्याच्या बाहेरील ५ रुग्ण श्रीगोंदा येथे नोंदविले. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्याची एकूण रुग्ण संख्या ८७४ झालेली आहे. सर्वात जास्त म्हणजे २१५ रुग्ण श्रीगोंदा शहरात आढळून आले.
त्याखालोखाल काष्टी येथे ८८, पेडगाव येथे ४८, बेलवंडी बुद्रुक – ४०, घारगाव येथे ३७, कोळगाव येथे २८, जंगलेवाडी येथे २४, देवदैठण- २३, पिंपळगाव पिसा- १९, मढेवडगाव-१९, पारगाव सुद्रिक-१७, हंगेवाडी-१७,
म्हातार पिंपरी -१६, पिंपरी कोलंदर -१६, लोणी व्यंकनाथ-१५, खरातवाडी (पिंपळगाव पिसा)- १४, शेडगाव- १३, श्रीगोंदा फॅक्टरी-१३, निमगाव खलू -११, लिंपणगाव-११ उक्कडगाव-१० याप्रमाणे रुग्ण आढळून आले आहेत.
वरील २१ गावात दहापेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत, तर बाकीच्या ५२ गावांत १ ते ९ रुग्ण आढळून आले आहेत. सुदैवाने तालुक्यातील उर्वरित ४३ गावांमध्ये एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही.
श्रीगोंदे तालुक्यातील एकूण रुग्णांशी बरे होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण ९१ टक्के असून, मृत्यूचे प्रमाण २.८६ टक्के आहे. श्रीगोंदे तालुक्यातील १७ गावांमध्ये २५ रुग्णांचे कोरोनामुळे निधन झालेले आहे.
त्यात १७ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश आहे. शहरातील ६ तर तालुक्याच्या ग्रामीण भागातील १९ रुग्ण आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. अशी माहिती श्रीगोंद्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved