अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी नगरमधील एका आरोग्य सेवकाचे कौतुक केले.
ठाकरे म्हणाले कि, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’मध्ये सध्या घरोघरी जाऊन तपासणी सुरु आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा वर्कस, महसुल यंत्रणा, पोलिस यासर्व कोरोना योद्धांचे मनापासून आभार मानले.
तसेच यावेळी नगरमधील आरोग्य सेवक सुदाम जाधव यांच्याविषयी बोलताना ठाकरे म्हणाले कि, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत कुटुंबीयांची तपासणी करताना जाधव यांना एका व्यक्तीची ऑक्सीजन लेवल कमी वाटली.
त्यावर जाधव यांनी संबंधित व्यक्तीस तात्काळ आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी केली. त्यावेळी त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
जाधव यांच्या सतर्कतेमुळे त्या व्यक्तीला तात्काळ उपचार मिळाले व काही दिवसात ती व्यक्ती पूर्ण बरी झाली. कोरोना काळात सेवा दिल्यामुळे नगरमधील आरोग्य सेवक सुदाम जाधव यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
मार्चपासून राज्यात कोरोना व्हायरसने हातपाय पसरायला सुरुवात केली. सध्या ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे.
त्याला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ होय. पुढील काही काळात आपण कोरोनाला हद्दपार करू असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved