माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील अशोकनगर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय केंद्रातील विद्यार्थ्यांनी कॉपी न करण्याची सामुहिक शपथ घेऊन बारावीच्या परीक्षेला सुरळीतपणे सुरुवात झाली.
तालुक्यातील अशोकनगर येथील (केंद्र क्रमांक ०२२७) या केंद्रातून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अशोकनगर, जानकीबाई आदिक माध्यमिक विद्यालय, खानापूर, अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, प्रगतीनगर, प्राईड अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज,
भेर्डापूर, कापसे पाटील विद्यालय, टाकळीभान, पटारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळीभान, रामराव आदिक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, अशोकनगर अशा ७ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना प्रा. दिलीप साळुंके यांनी परीक्षेत कॉपी न करण्याची शपथ दिली.
केंद्राच्या वतीने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अशोक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनीता गायकवाड यांनी स्वागत व मार्गदर्शन केले. यावेळी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य सुयोग थोरात, केंद्रसंचालक प्रा. नितीन वेताळ, उपकेंद्र संचालक प्रा. कैलास जाधव,
वरिष्ठ विभागाचे परीक्षा अधिकारी प्रा. दिलीप खंडागळे, प्रा. सुनील औताडे, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे, प्रा. रवींद्र वारुळे, प्रा. गणेश हळनोर, प्रा. सुरेश कोकणे, प्रा. किशोर उदरभरे, प्रा. आनंद खंडागळे, प्रा. प्रदीप गोराणे, प्रा. सुनील भरिंडवाल, प्रा. वर्षा सोलापूरकर, प्रा. कल्याणी साळुंके, प्रा. हिना शेख उपस्थित होते.
पुणे विभागीय बोर्डाच्या सर्व सूचनेचे काटेकोर पालन करीत महसूल खात्याचे व पंचायत समितीचे बैठे पथक, पोलीस आणि अशोक कारखान्याचे सुरक्षा रक्षक यांच्या बंदोबस्तात बारावी बोर्डाच्या परीक्षेला इंग्रजीच्या पेपरपासून सुरळीतपणे सुरुवात झाली.