अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-श्रीगोंदा शहरातील लेंडी -नाला, कचरा डेपो,अभ्यासिका, क्रीडा संकुल या रखडलेल्या प्रकल्पांच्या अडचणी व समस्या दूर करून शहराच्या विकासात भर करण्यासाठी सहकार्य करू असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी नगरपालिकेत केले.
श्रीगोंदा येथे आज जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले भेट देऊन कोरोना स्थितीचा आढावा, ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात तपासणी व प्रशासनाच्या तयारीची माहिती घेतली.
अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे श्रीगोंदे शहरातील अनेक विकासकामांबाबत नागरिकांच्या अनेक दिवसांपासून तक्रारी आल्या होत्या
या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करून चर्चा केली. समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देऊन लवकरात लवकर रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लागतील यामध्ये शहरातील लेंडी नाला सुशोभीकरण करण्यासाठी सहा कोटी निधी येऊन पडला आहे
परंतु ते ठिकाण इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे कामे करण्यास बंदी असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे यावर आपण लवकरात लवकर तोडगा काढू.
तसेच सार्वजनिक अभ्यासिका येथे काही लोकांनी अतिक्रमण केले आहे.त्यांचे पालिकेच्या वतीने पुनर्वसन करून अभ्यासिकेचे राहिलेले काम पूर्ण करण्याचे आदेश पालिकेला त्यांनी दिले.
शहरातील कचरा डेपोसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले कचरा डेपोचे चांगले नियोजन करून शेजारील शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचा आदेश यावेळी पालिकेला दिला.
तसेच श्रीगोंदे शहरातील शाहूनगर येथील ड्रेनेजसाठी जो प्रस्ताव दाखल केला आहे तोही तात्काळ मंजूर करू आणि श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी यापुढे प्रस्ताव सादर करा सहकार्य करू असे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले श्रीगोंदा नगरपालिकेत जिल्हाधिकारी भोसले यांचा नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे,
गटनेते व नगरसेवक मनोहर पोटे यांनी स्वागत केले. पालिकेच्या वतीने विकासकामांची माहिती प्रशांत गोरे यांनी दिली. यावेळी तहसीलदार प्रदीपकुमार पवार,
अप्पर तपासचारुशीला पवारनायब तहसीलदार सायली नांदे,डॉ. योगिता ढोले, मुख्याधिकारी मंगेश देवरे, सतीश मखरे, गणेश भोस, दीपक शिंदे यांसह नागरिक उपस्थित होते.