अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार आज सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आयुक्तपदाचा प्रभारी चार्ज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे.
या रिक्त पदाचा कार्यभार पुढील आदेश होइपर्यंत जिल्हाधिकारी भोसले यांच्याकडेच राहाणार असल्याचे नगरविकास खात्याच्या सचिवांनी पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे.
मायकलवार यांनी मार्च महिन्यात महानगरपालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली होती. त्यामुळे नगर येथील कार्यकाळ हा नऊ महिन्यांचा राहिला.
त्याआगोदर मनपा आयुक्त पदावर यापूर्वी दोन वेळा प्रभारी म्हणून नगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काम पाहिले. आता पुन्हा प्रभारी चार्ज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे देण्यात आला.