Ahilyanagar News:- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खूप रंगात आली असून विक्रम पाचपुते यांनी मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या गाठीभेटी तसेच संवाद साधण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. अगदी याच प्रमाणे बुधवारी तालुक्यातील घारगाव या ठिकाणी प्रचार सभा घेतली
व या सभेमध्ये बोलताना त्यांनी कुकडीच्या प्रश्नावर अनेक मुद्दे मांडले व यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, आमदार बबनराव पाचपुते यांनी पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर नेहमीच भर दिला आहे.
सध्या कुकडीच्या अस्तरीकरण होणे गरजेचे आहे व त्याकरिता पाठपुरावा करून 160 कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. येणाऱ्या कालावधीत मी देखील कुकडीच्या प्रश्नासाठी माझी आमदारकी पणाला लावेल अशी ग्वाही त्यांनी या निमित्ताने नागरिकांना देखील.
कुकडीच्या कालव्याच्या पाण्याकरिता माझी आमदारकी पणाला लावेल- विक्रम पाचपुते यांची ग्वाही
आमदार बबनराव पाचपुते यांनी पाण्याचे योग्य नियोजनावर नेहमीच भर दिला असून त्याचाच भाग म्हणून त्यांनी 160 कोटी रुपयांचा निधी हा कुकडीचे अस्तरीकरण करण्यासाठी मिळवला आहे. अगदी त्याचप्रमाणे मी देखील भविष्यात कुकडीच्या प्रश्नासाठी माझी आमदारकी पणाला लावेल अशी ग्वाही भाजपा महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी दिली आहे.
बुधवारी घारगाव येथे आयोजित प्रचार सभेमध्येते बोलत होते. या सभेचे अध्यक्षस्थानी मार्केट फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे होते. यावेळी बोलताना विक्रम पाचपुते यांनी म्हटले की, फक्त एकदा माझ्यावर विश्वास टाका व तुम्ही टाकलेल्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही.
श्रीगोंदा तालुक्यातील जर महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न कोणता असेल तर तो कुकडीचे पाणी हा आहे. जेव्हा हे पाणी सोडले जाते तेव्हा ते आपल्याला उशिरा मिळते. यामागील प्रमुख कारण म्हणजे पुणे जिल्ह्यात कुकडीच्या वितरिकांमध्ये पाण्याची गळती होते.
याकरिता आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून 160 कोटींचा निधी कालवा अस्तरीकरणास मिळाला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली व लवकरच पाणी मिळेल व एक आवर्तन वाढवण्यास देखील यामुळे मदत होईल असे देखील त्यांनी म्हटले.
या सभेमध्ये भाजपचे नेते भूषण बडवे यांनी म्हटले की, विक्रम पाचपुते यांच्यासारखा अभ्यासू तरुणाची उमेदवारी ही जनतेसाठी असून विरोधकांची उमेदवारी ही स्वार्थासाठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या प्रचार सभेवेळी भाजप महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.