अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- कोरोना संसर्ग विषाणूमुळे प्रत्येक मनुष्यावर एक संकट आले आहे. त्यात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. त्यामुळे अनेकांच्या उपजिविकेचे साधन बंद आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या संकटकाळामध्ये अंधांची रोजीरोटीच बंद झाली आहे. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र अहमदनगरचे 270 अंध सदस्य आहेत. शहरातील 35 अंधांना मदतीचा हात देण्यासाठी आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्याकडे गेलो असता,
त्यांनी लगेच 35 अंधांच्या घरपोच अन्नधान्य वाटप केले. अंधांसाठी धावून येणारे आ. संग्राम जगताप आहेत. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ ही अंधांद्वारे अंधांसाठी अंधांमार्फत चालविली जाणारी बिगर राजकीय सामाजिक संस्था असून, आम्ही वर्षभर अंधांसाठी काम करत आहे.
या काळामध्ये बेरोजगार अंधांना शासनाच्या योजना घरापर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही करीत आहे. तसेच अंध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्याचे प्रयत्न करीत आहे.
कोरोनामुळे अंधांवर वाईट परिस्थिती ओढवली आहे. या काळामध्ये आ. संग्राम जगातप आमच्यासाठी धावून आले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नितीन सोनार, महासचिव श्रीकांत माचवे यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®