अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- आ. कानडे यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे. त्यांनी शहरातील बेलापूर रोडवरील श्रीरामपूर खरेदी विक्री संघाचे कार्यालय करार करून आपल्या जनसंपर्क कार्यालयासाठी ताब्यात घेतले आहे असा आरोप खरेदी विक्री संघाचे चेअरमन गणेश मुदगुले यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी नगर येथील उपनिबंधक कार्यालय आणि शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तर आ. लहु कानडे यांनी ‘खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात सामान नव्हते.
रिकामी रूम आम्हाला दाखविण्यात आली. त्यानंतर आम्ही करार करून तो दुय्यम निबंधकांकडे नोंदविला. भाडेकरू म्हणून या जागेत माझी एन्ट्री झाली आहे. त्यामुळे कायदा मोडण्याचा संबंध नाही. कायदे मंडळाचा मी सदस्य आहे. मला कायदा कळतो.’ असे स्पष्ट केले.
काय आहे आरोप ? :- श्रीरामपूर देखरेख संघाच्या इमारतीत वरच्या मजल्यावर देखरेख संघाचे कार्यालय आहे. देखरेख संघाचे चेअरमन इंद्रनाथ थोरात व सचिव जे.बी.नरसाळे यांनी करार करून या इमारतीमधील तळमजल्यातील 1 रूम भाडे कराराने दिलेला होता.
संस्थेचे कामकाज या ठिकाणावरून करण्यात येत आहे. असे असतानाही थोरात आणि नरसाळे यांनी आ. लहु कानडे यांच्याशी लिव्ह अॅण्ड लायसेन्सी करार केला. संघाच्या इमारतीच्या खालची जागा आ. कानडे यांच्या संपर्क कार्यालयास पाच वर्षांसाठी कराराने देण्यात आलेली आहे, असा आरोप मुदगुले यांनी केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved