अहमदनगर बातम्या

अय्यो! त्यांनी केले जखमी असलेल्या ‘नागा’वर उपचार या ठिकाणी घडली ही घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  आपण आतापर्यंत अनेक जखमी झालेल्या प्राण्यांवर उपचार करून त्यांना ठिक केल्याचे ऐकले अथवा पाहिले आहे.(Wounded snake)

मात्र यांनी चक्क सापावरच उपचार केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे जखमी नागाच्या जबड्यासह फण्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशस्वी उपचार करत त्याला जीवनदान दिले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी या परिसरात मुंगूस व नागाची लढाई सुरु होती. यात हा नाग चांगलाच जखमी झाला होता. दरम्यान एका सर्पमित्राने या मुंगसाच्या तावडीतून त्या नागाची सुटका केली होती.

यावेळी नागाचा जबडा तसेच फण्याला जखम झाल्याने त्यातून रक्त येत असल्याने त्याच्यावर उपचार करणे गरजेचे होते. त्यामुळे त्याने

येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागाला उपचारासाठी दवाखान्यात नेले. येथे त्याच्यावर उपचार करून त्याला निसर्गात मुक्त केले.

Ahmednagarlive24 Office