आ. निलेश लंकेंनी केलं `या` धरणांचे जलपूजन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-  ऑगस्ट महिन्यात मांडओहोळ धरण व तिखोल धरण परिसरात धुव्वाधार पाऊस झाल्याने दोन्ही जलाशय ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पारनेर तालुक्यासाठी हे प्रकल्प जलसंजीवनी ठरलेले आहेत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यासह आमदार निलेश लंके यांनी धरणावर जाऊन जलपूजन केलं. यावर्षी वरूणराजाच्या कृपेने व माझ्या पायगुणाने समजा पारनेर तालुक्याची तहान भागविणारे मांडओहोळ, ढवळपूरी, तिखोल धरणासह इतर छोटे मोठे मध्यम प्रकल्प ऑगस्टमध्ये पुर्ण क्षमतेने भरले आहेत, असे आमदार निलेश लंके म्हणाले.

पारनेरकरांसाठी आगामी काळ हा सुखसमृध्दीचा असून बळीराजापाठी अशीच कृपादृष्टी अशीच राहू दे, असे साकडे आमदार निलेश लंके यांनी ईश्वराला घातले. पारनेर तालुक्यात यावर्षी समाधानकारक पीक आले आहे तर काही भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

मात्र कोरोनाचे संकट आपल्यावर घोंघावत असून प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आ. निलेश लंके यांनी केले आहे. पारनेर तालुक्याला मांडओहोळ धरण व तिखोल येथील प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला असून शुक्रवारी (दि. 28 ऑगस्ट) आ. निलेश लंके यांनी दोन्ही ठिकाणी जलपुजन केले आहे.

यावेळी पाणीवाटप संस्थेचे चेअरमन शिवाजी ठाणगे, सतिश भालेकर, संदीप ठाणगे, गणेश ठाणगे, ग्रा.पं.सदस्य चाँद इनामदार, संदिप कावरे, दत्तात्रय ठाणगे, व्हा.चेअरमन बाळासाहेब ठाणगे, पोपट ठाणगे, शिवाजी ठाणगे, अशोक ठाणगे, सतिश ठाणगे, शंकर ठाणगे, गणपत ठाणगे, योगेश ठाणगे, भानुदास ठाणगे,

सबाजी ठाणगे, सोमनाथ साळवे, संकेत ठाणगे, किरण दातीर, अशोक मंचरे, अंबादास ठाणगे, भानुदास ठाणगे, उत्तम साळवे, धोंडीबा ठाणगे, शिवाजी खोडदे, संभाजी खोडदे, जवाहरलाल ठाणगे, संकेत कावरे, नाना ठाणगे, सुजित ठाणगे, शानुर तांबोळी, बी.डी.ठाणगे, ल. कि. ठाणगे गुरुजी, पेरूबाई ठाणगे,

अर्जुन ठाणगे, संभाजी वाळुंज, काकणेवाडीचे माजी सरपंच निवृत्ती वाळुंज, शिवाजी वाळुंज आदी ग्रामस्थांसह व्हि. टि. शिंदे, तांबोळी साहेब, सिंचन विभागाचे अभियंता प्रमोद घनदाट, बहिराट साहेब, सचिव विजय जाधव हे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी तिखोलचा सुपुत्र व टाकळी ढोकेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी अरविंद सुदाम ठाणगे याचा सत्कार आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला. बारावीत या विद्यार्थ्याने 75 टक्के गुण विद्यालयात तृतीय क्रमांक मिळविला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24