आ. निलेश लंके म्हणाले मतदार संघासाठी 85 कोटींचा मास्टर प्लॅन तयार आहे. मात्र कोरोनामुळे….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- मतदार संघ विकासासाठी 85 कोटींचा मास्टर प्लॅन तयार आहे. मात्र कोरोनामुळे आपला माणूस जगला पाहिजे त्यांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे

यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. निघोज व परिसरातील सव्वा कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आ. लंके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ते बोलत होते.आमदार लंके म्हणाले, गेली पंधरा वर्षे झाली नाहीत त्यापेक्षा जास्त कामे येत्या पाच वर्षांत होणार आहेत. यासाठी विकासयोजना तयार आहेत. राज्यसरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.

मात्र कोरोनाचे रुग्ण मतदारसंघात वाढत आहे. जनतेचे आरोग्य महत्वपूर्ण आहे. यासाठी आपण कोविड सेंटरच्या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

निघोज ग्रामपंचायत माध्यमातून गेली पाच वर्षात मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. राज्य सरकार विकासकामांसाठी सातत्याने पाठबळ देत असून

आजपर्यंत जेवढे कामे घेउन गेलो त्याला मंजूरी मिळाली असून विकासकामे हेच आपले उद्दिष्ट असल्याची ग्वाही आमदार लंके यांनी दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24