अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :पारनेर आणि नगर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले तीन महिने प्रभावी योगदान दिले. तसेच परप्रांतीय आणि परजिल्ह्यातील बांधवांसाठी सुरु अन्नछत्र केले.
त्यांना ‘घरवापसी’साठी प्रयत्न केले. त्यांचे हे योगदान विचारात घेता आ. लंके यांना कोविड- १९ योद्धा समाज रक्षक सन्मान २०२० हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतला.
संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा राणी कर्डिले यांच्या हस्ते आ. लंके यांना गौरविण्यात आले. कोविड- १९ या जागतिक आपत्तीमध्ये आपण भारत देशासाठी समाजासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांची सुरक्षितता अन्नदान वैद्यकीय मदत,
सल्ला मार्गदर्शन, बाहेरगावी जाणार्या लोकांना त्यांचा गावी सुखरूप पोहचवणे, रस्त्याने पायी जाणार्यांसाठी मोफत चप्पल वाटप तसेच माणुसकी आणि सामाजिक जाणिवेतून बजाविलेले प्रत्येक कर्तव्य खरेच स्पृहणीय आणि प्रेरणादायक आहे.
त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, या सन्मान सोहळ्यास अध्यक्षा राणी कर्डिले यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते अमोल खराळे, उमेश घावटे, सुनंदा घावटे आदी मान्यवर उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews