आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश ; रिक्षाचालकांसाठीचा विलंब परवाना शुल्क प्रतिदिन ५० रुपयांचा दंड पूर्णपणे माफ

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : राज्यातील रिक्षा टॅक्सी मालवाहतूक वाहन चालकांनी आपल्या वाहनाचा परवाना शुल्क वेळेत न भरल्यास त्यांना प्रतिदिन ५० रुपयांचा दंड लावण्यात येत होता, या मागणीसाठी राज्यातील विविध रिक्षा संघटनांनी जिल्हा स्तरावर आंदोलने केली होती. याच पार्श्वभूमीवर नगर शहराचे आ. संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रिक्षा चालकांचा प्रश्न मंडल होता.

त्या पार्श्वभूमीवर दि. २८ तारखेला परिवहन सचिव व आयुक्त तसेच  अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली कारण रिक्षा चालक सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांची उपजीविका रिक्षावरच अवलंबवून आहे. प्रतिदिन ५० रुपये दंड भरणे म्हणजे रिक्षा टॅक्सी मालवाहतूक चालकांसाठी हे अन्यायकारक आहे.

याबाबत आ. संग्राम जगताप यांनी मांडलेल्या प्रश्नाला यश आले आणि मंत्रिमंडळात विषय मांडला असून राज्यमंत्री दादा भुसे यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर याबाबत हा ५० रुपयांचा दंड पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय झाला अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

दरम्यान वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देताना विलंब झाल्यास प्रत्येक दिवसाला ५० रुपयांचे विलंब शुल्क आकारले जात असल्याने रिक्षा चालक चांगलेच वैतागले आहेत.रिक्षाचालकांसाठीचा विलंब परवाना शुल्क प्रतिदिन ५० रुपयांचा दंड पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय झाला अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सरकारच्या या निर्णयाने रिक्षाचालकांना दिलासा मिळाला आहे. हा निर्णय रिक्षाचालकांसाठी अन्याकारक असून तो रद्द करावा या मागणीसाठी राज्यातील विविध रिक्षा संघटनांनी जिल्हा स्तरावर आंदोलने केली होती. याच पार्श्वभूमीवर नगर शहराचे आ. संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रिक्षा चालकांचा प्रश्न मंडल होता.अखेर त्याला यश आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe