दिलासादायक! आज कोरोनामुळे एकही मृत्यु नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाबाबत जिल्हावासियांना दिलासादायक अशी आज बातमी समोर येत आहे. कोरोना उपचारादरम्यान आज एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. त्याचबरोबर १ हजार ३१ रुग्णांना कोरोना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

परंतु जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ७५३ जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. सध्या ३ हजार ६५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये आज २३८, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत १९४ आणि अँटीजेन चाचणीत ३२१ जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24