अहमदनगर बातम्या

मध्यरात्री येत बिबट्याने शेळीवर हल्ला चढवला; या तालुक्यातील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परीसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकर्‍यांची शेळी गंभीर जखमी झाल्याची घटना भोकर परीसरात घडली.(Leopard news) 

वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. भोकर परीसरात काही महिन्यांपासून बिबट्यासह मादी व बछड्याचा वावर आहे, बिबट्याने या परीसरातील अनेक कुत्रे, शेळ्या, मेंढ्या फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत.

नुकतेच शेतकरी नामदेव सुकदेव वाकडे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यावर बिबट्याने झडप घालून गाभण शेळीवर हल्ला चढविला.

हा प्रकार नामदेव वाकडे यांचे लक्षात आल्याने त्यांनी लागलीच धाव घेत ओरडा करत बिबट्याच्या तावडीतून शेळीची सुटका केली.

जखमी शेळीवर टाकळीभान येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप कोकणे यांनी उपचार केले. या घटनेने भितीचे वातावरण आहे.

परीसरातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office