Ahmednagar News : आमदार निलेश लंके यांचा पारनेर मतदार संघ व तेथील जनता ही लंके यांच्याशी थेट जोडली गेली आहे. त्यांची कामे करण्याची पद्धत, कार्यकर्त्यांवर थेट पकड, लोककार्य करण्यासाठी सदैव तत्परता यामुळे मतदारांशी त्यांची थेट नाळ जुळली आहे.
याचाच फायदा घेत मध्यंतरी आ. लंके यांना खासदारकीचे तिकीट देऊन विखे याना फाईट दिली जाणार अशी चर्चा होती. कारण विखे व पवार यांचे राजकीय वैरत्व सर्वश्रुत होतेच परंतु मोठ्या पवारांनी तशी फिल्डिंग देखील दाखवली.
परंतु अजित पवार गट सत्तेत गेला व लंके विरुद्ध विखे अशी लढत जवळपास संपुष्टात आली असल्याची चिन्हे निर्माण झाली. अजित पवार पारनेर दौऱ्यावर आले होते.या ठिकाणी त्यांनी आ.लंके यांवर स्तुतीसुमने उधळली. १५०० कोटींच्या कामांचा वायदा केला. त्यामुळे अजित पवार यांनी शरद पवारांचाच कित्ता गिरवला. व लोकसभेसाठी प्रमोट केले अशी चर्चा रंगलीय.
विखेंचे टेन्शन वाढले
कार्यक्रमात अजित दादांनी जे पाठबळ लंके यांना दिले त्यावरून लंके विरूद्ध भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे संघर्षात दादा लंके यांच्या पाठीशी ठाम असल्याचे समोर आलेय. मध्यंतरी सर्वच बाजूने विखे यांनी लंके याना घेरण्यास सुरवात केल्याचं दिसलं.
स्थानिक विरोधक देखील तयार केले. विकासकामे दिली. यातून त्यांचा मार्ग सुकर होईल असे वाटत असतानाच आज पवार यांनी जी खेळी केली त्यातून लंके खूप प्रमोट होतील. थेट उपमुख्यमंत्र्यांना खेचून आणण्याची व दीडहजार कोटी घेण्याची ताकद जनतेला दिसली. त्यामुळे आता विखे यांचे टेन्शन पुन्हा वाढले आहे.
देवेंद्र फडणवीसांना शह
अहमदनगर जिल्ह्याची राजकीय जबाबदारी भाजपने फडणीवसांवर सोपवली आहे. त्यामुळे नगरमधील मार्ग कसा सुकर होईल याचे प्रयत्न सध्या फडणवीस करत आहेत.
अजित दादांना सोबत घेण्याची खेळीही त्यासाठीच होती. परंतु आता अजित दादांनी ज्या पद्धतीने लंके याना प्रमोट केले म्हणजे ही जर लोकसभेची पूर्वतयारी असेल तर मग हा थेट विखे विरुद्ध लढण्याची तयारी असेल तर मग हा थेट फडणवीसांना शह आहे का? अशी चर्चा सध्या रंगली आहे.