अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :केंद्र व राज्य शासनाच्या परवानगीने आता कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार सुरू झाले आहेत. श्रीरामपूर येथील त्रिमूर्ती आयुर्वेदिक संशोधन व विकास संस्थेला कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी मिळाली असून
संगमनेर व श्रीरामपुरात ही संस्था रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार करणार आहे. त्रिमूर्तीचे डॉ. महेश व डॉ. मंजिरी क्षीरसागर यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.
त्याला नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे, ज़िल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, ज़िल्हा आयुष अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके,
तसेच आयुर्वेद तज्ज्ञ प्र. शि. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर व संगमनेर येथे उपचार करण्यास परवानगी मिळाली. दादा वामन जोशी मराठी शाळेतील विलगीकरण कक्षातील ३६ व्यक्तींवर आयुर्वेदिक उपचार सुरू करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे, डॉ. संकेत मुंदडा, मिलिंद वाळुंजकर, संदीप त्रिंबके, दीपक बागूल, अभिषेक लकरस, अस्मिता क्षीरसागर,
सुनीता मोजाड उपस्थित होते, असे डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले. संस्थेने यापूर्वीच महसूल, पोलिस, आरोग्य, एसटी, रेल्वे कर्मचारी, तसेच ३ हजार व्यक्तींना मोफत औषधे दिली आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews