अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच महानगरपालिकेतील अधिकाऱ्यास कोरोनाने ग्रासल्याचे समोर आले.
महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याने महापालिका बंद ठेवण्यात आली होती. आता आजपासून मनपाचा कारभार सुरु झाला आहे.
सावधगिरी म्हणून महापालिका प्रशासन कर्मचार्यांची आरोग्य तपासणी करणार आहे. तसेच महापालिकेच्या कामकाजाला आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे.
प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्यांची आरोग्य तपासणी करा तरच कामावर हजर होऊ अशी भूमिका कामगार युनियन घेतली होती.
त्यानुसार झालेल्या बैठकीत महापालिकेच्या सर्व कर्मचार्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, तसेच नवीन प्रशासकीय इमारतीत अतिशय महत्त्वाचे काम असणार्याच नागरिकांना प्रवेश देण्यात येईल,
असे निश्चित करण्यात आले. नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व कर्मचार्यांनी सकाळी कामावर यावे. त्यांच्या कामाच्या जागेवर महापालिकेचे वैद्यकीय पथक येईल.
हे पथक तपासणी, पल्स व ऑक्सिजन काउंट तसेच थर्मल स्कॅनिंग करेल. प्राथमिक तपासणी शंकास्पद वाटल्यास त्याची करोना चाचणी केली जाईल, असे यावेळी ठरले.
आयुक्त श्रीकांत मायकलवार, महापौर बाबासाहेब वाकळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, उपाध्यक्ष अय्युब शेख, अकील सय्यद आदी या बैठकीस उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews