लसीकरणाचा शुभारंभ…राहुरीत कोविड लसीकरणास सुरुवात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- राहुरी शहरातील राहुरी ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी ८० जणांना लस टोचण्यात आली.

पहिल्या टप्प्यात तालुक्यातील आरोग्य विभाग व महसूल विभागातील एक हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे. रोज शंभर जणांना लस दिली जाणार आहे.

या शंभर जणांच्या नावांची निश्चिती अहमदनगरहून होईल, अशी माहिती डॉ. जासूद यांनी दिली. हा पहिला टप्पा पार पडल्यानंतर अन्य नागरिकांना लसीकरणाच्या विचार केला जाणार असल्याचे डॉ. जासूद यांनी सांगितले.

दरम्यान याप्रसंगी सोनाली प्राजक्त तनपुरे, तहसीलदार फसीउद्दीन शेख, गटविकास अधिकारी गोविंद खेमनर, मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे, वै

द्यकीय अधिकारी श्रीमती गायकवाड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय पर्यवेक्षक श्रीकांत पाठक, डॉ. संदीप आठरे, डॉ. वैभव जासूद, डॉ. वैशाली पवार, डॉ. प्रीतम चुत्तर आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24