अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- येथील सिध्दार्थनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शाखा साठे चौक व सिध्दार्थनगरच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा असलेल्या स्वागत कमानीच्या कामाचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी यावेळी अभिजीत खोसे, संजय झिंजे, पै.अंकुश मोहिते, संजय लोखंडे, गुलाबराव गाडे, वैभव वाघ, विजय साठे, राहुल लोखंडे, रोहित लोखंडे, शुभम लोखंडे,
हुसेन शेख, आदेश लोंढे, विलास भोसले, प्रविण लोखंडे, किरण लोखंडे, संजय घोरपडे, तुळशी भालेराव, बाबासाहेब साठे, अनिल वाघमारे आदिंसह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रांतीविर लहुजी वस्ताद साळवे व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या स्वागत कमानीच्या कामाचे प्रारंभ करण्यात आले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, क्रांतीविर लहुजी वस्ताद साळवे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार व आदर्श सर्व समाजाला दिशादर्शक आहे.
आजच्या युवकांनी या महापुरुषांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. सिध्दार्थनगर हे शहरातील मुख्य रस्त्यांना जोडणारा चौक आहे. या भागात स्वागत कमान उभारुन या महापुरुषांचे प्रतिमा लावण्यात येणार आहे.
ही कमान प्रत्येकाला स्फुर्ती व प्रेरणा देण्याचे कार्य करेल व युवकांना या महान व्यक्तींचे कार्याचा सकारात्मक प्रभाव पडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दादाभाऊ कळमकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शाखेच्या वतीने उभारण्यात येत असलेली स्वागत कमान ही प्रेरणादायी उपक्रम आहे. संजय लोखंडे यांनी परिसरातील नागरिकांसाठी स्वखर्चाने स्वागत कमान व स्वच्छतागृह उभारुन सामाजिक कार्यास हातभार लावला असल्याचे सांगितले.
सिद्धार्थनगर भागातील नागरिकांसाठी संजय लोखंडे यांनी स्वखर्चाने स्वागत कमान व स्वच्छतागृह बांधल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश मोहिते यांनी केले. प्रास्ताविक कामगार युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव गाडे यांनी केले. आभार संजय लोखंडे यांनी मानले.