अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- केडगावच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही . केडगावचा रचनात्मक विकास करण्यासाठी कटिबध्द असुन त्यासाठी नियोजनबध्द विकासकामे हाती घेण्यात येत असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली .
केडगाव येथील नविन गावठाण परिसरात असणाऱ्या बोल्हाईमाता मंदिराच्या जिर्णोध्दर कामाचे भुमिपुजन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले .
त्यावेळी ते बोलत होते . यावेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर , नगरसेवक राहुल कांबळे , माजी सरपंच रामदास येवले , केडगाव सेवा संस्थेचे अध्यक्ष अंजाबापु सातपुते , रावसाहेब सातपुते , अनिल ठुबे , शशिकांत आठरे, जयद्रथ खाकाळ आदि उपस्थीत होते .
यावेळी जगताप म्हणाले की ,केडगाव येथे असणाऱ्या बोल्हाई माता मंदिराच्या विकास कामाला भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे .
याठिकाणी होणाऱ्या सांस्कृतीक सभागृहाचा उपयोग गोरगरिबांच्या कार्यक्रमासाठी व धार्मिक कार्यासाठी होणार असल्याने हे मंदिर केडगावच्या विकासाचा मानबिंदू ठरणार आहे .
यावेळी बाबासाहेब कोतकर , जालिंदर कोतकर , बच्चन कोतकर , अनिल आंधळे , रामदास महाराज क्षिरसागर , रमेश परतानी , राजेंद्र पवार , आसाराम जगदाळे आदि उपस्थीत होते . माजी सरपंच प्रभाकर गुंड यांनी उपस्थीतांचे स्वागत केले .