अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सेवा सोसायटीमार्फत होते.
यासाठी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम पदाधिकारी व सचिवांनी करावे. आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा बँकेच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सोसायटीने करावे. वेगवेगळी पीके घेऊन शेतकऱ्यांना शेतीमालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळवून द्यावी.
बुरुडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रावसाहेब तर व्हा. चेअरमनपदी संभाजी शिंदे यांच्या निवडीप्रसंगी आ. संग्राम जगताप बोलत होते.
बुरुडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रावसाहेब तर व्हा. चेअरमनपदी संभाजी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना आ. संग्राम जगताप.
समवेत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, माजी सरपंच बापूसाहेब कुलट, जय मातादी पॅनलचे नवनाथ वाघ, खंडू काळे, ज्ञानदेव कुलट, संजय कुलट, विलास जाधव, जब्बार शेख, संजय मोडवे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रावसाहेब मोडवे म्हणाले की, ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास टाकून सोसायटीच्या चेअरमनपदी निवड केली. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
शेतकऱ्यांपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजना पोहचविण्याचे काम करु. आ. संग्राम जगताप, आ. अरुण जगताप व मा.आ.शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करीत आहे. सर्वांना विश्वासात घेऊन काम करु. असे ते म्हणाले.\
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved