अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- बर्ड फ्लूमुळे मेलेल्या कोंबड्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याचे निर्देश जि. प. अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी शुक्रवारी दिले. कुक्कुटपालकांना ५ लाख ३६ हजारांची मदत मिळणार आहे.
बर्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या मेल्या. नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथे पक्ष्यांच्या नुकसान भरपाईपोटी ४० हजार, शिंदोडी, मांडवा खुर्द व सडे येथील मृत्यू पावलेल्या पक्ष्यांच्या नुकसान भरपाईपोटी ४ लाख ९६ हजारांची भरपाई देण्याचे निर्देश गडाख यांनी दिले.
ब्राॅयलर कोंबडी ० ते ६ आठवडे २० रुपये, सहा आठवड्यांपेक्षा जास्त असल्यास ७० रुपये, अंडी देणारी कोंबडी २० रुपये, आठ आठवड्यांपेक्षा जास्त असल्यास ९० रुपये, पक्षी खाद्य १२ रुपये किलो,
अंडी तीन रुपये अशी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.चिंचोडी पाटील येथील ७, सडे येथील २९, शिंदोडी येथील ४४ व मांडवा येथील कुक्कुटपालकांना ही मदत दिली जाणार आहे.