ग्रामपंचायतीचे भंगार सामान चोरीस , तक्रार दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- बेलापूर ग्रामपंचायतीचे भंगार सामान चोरीस गेले असून या गंभीर घटनेस आठ दिवस उलटून गेले, तरी तेरी भी चूप, मेरी भी चूप असाच काहीसा प्रकार या घटनेबाबत घडलेला होता.

मात्र, याची चर्चा सुरू झाल्यावर फिर्याद दाखल करण्यात आली. बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवर ग्रामपंचायतीच्या मालकीचे लोखंड पडलेले होते. तसेच तेथे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे टीसीएल पावडर, तुरटी आदी सामान पडलेले होते. या ठिकाणी देखरेखीसाठी एका कर्मचाऱ्याची देखील नेमणूक केली.

याशिवाय या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा देखील वाॅच असतो. असे असतानाही ग्रामपंचायतीच्या मालकीचे सामान चोरी गेले आहे. परंतु या घटनेस आठ दिवस झालेले असून त्याबाबत ग्रामसेवक राजेंद्र तगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बेलापूर पोलिसांकडे तक्रार दिली असल्याचे सांगितले. भंगार व इतर साहित्य चोरीस गेल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला.

आपले कारनामे कॅमेऱ्यात बंद होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची केबल जाळल्याची चर्चाही आहे. दरम्यान, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे यांनी बेलापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

कर्मचारी मनोज खर्डे यांनी सुभाषवाडी तळ्यावरील विजेचे खराब झालेले कंडक्टर आणून येथील स्टोअर रूममध्ये ठेवलेले होते. मात्र, ते आता गायब झाले. १९ हजार २०० रुपयांचे कंडक्टर व १० हजार रुपयांचे इतर भंगार असे २९ हजार २०० रुपयांचे सामान चोरीला गेल्याचे म्हटले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24