ग्रामपंचायत सदस्याच्या अतिक्रमणाबाबत तहसीलदारांकडे तक्रार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून विजयी झालेले उमेदवार अनिल रावसाहेब आंबेकर यांनी गावठाण हद्दीत त्यांच्या नावे असलेल्या

जागेव्यतिरिक्त जास्त जागेत अतिक्रमण केले असल्याची तक्रार भाऊसाहेब नारायण पंडोरे यांनी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

पंडोरे यांनी तहसीलदारांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले, की अनिल रावसाहेब आंबेकर यांनी ग्रामपंचायत गावठाण हद्दीत त्यांच्या नावे असलेल्या जागेव्यतिरिक्त जागेवर अतिक्रमण केले आहे.

त्यामुळे याबाबत आपण शहानिशा करावी व आंबेकर यांचे सदस्यत्व रद्द करावे आणि त्यांच्या प्रभागामध्ये पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दि. १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली.

त्यात नऊ सदस्य निवडून आले. त्यातील प्रभाग क्रमांक दोनमधील उमेदवार अनिल आंबेकर विजयी झाले. त्यांनी अतिक्रमण केले आहे.

याबाबत निर्णय होईपर्यंत सरपंच आरक्षणाच्या सोडतीस स्थगिती देण्यात यावी. तोपर्यंत ग्रामविकास अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त करावे, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24