अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आखली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत पीककर्ज सरसकट माफ केले.
मात्र कर्जमाफीच्या निकषानुसार पात्र असणार्या अनेक शेतकर्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही. ते पात्र की अपात्र याबाबत शासनाकडून कोणतीही स्पष्ट सूचना नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
त्यामुळे त्यांना चालू खरीप हंगामासाठी पिककर्ज मिळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. राहाता तालुक्यात 73 सेवा संस्था असून त्यांचे अंदाजे 956 3 सभासद आहेत
त्यापैकी 8165 सभासदांना 5 3 कोटी 27 लाखाची कर्जमाफी मिळाली आहे. अजून 1398 सभासद कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहे. यामध्ये तांत्रिक कारणामुळे ज्यांनी नावे प्रलंबित आहेत
त्यात दुरुस्ती करून त्यांचा समावेश कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे राहाता येथील जिल्हा बँकेच्या तालुका विकास अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र त्यातील शासनाच्या कर्जमाफीच्या यादीत नाव न आलेल्या शेतकर्यांची संख्या 535 असून या शेतकर्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला
नाही व नवीन कर्ज घेतांना त्यांना अडचणी येत आहे हे शेतकरी कर्जमाफीच्या निकषात बसतात मात्र शासनाच्या यादीत नाव नसल्यामुळे त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews