अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- लष्कराच्या के.के.रेंज या युद्ध प्रशिक्षण व सराव क्षेत्राच्या विस्तारीकरणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजला होता. हा प्रश्न थेट दिल्लीवारी करून देखील आला आहे.
दरम्यान पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. लष्कराच्या के. के. रेंजप्रकरणी कोणत्याही जमिनीचे अधिग्रहण होणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पुन्हा एकदा केला आहे. भाजप खासदार सुजय विखेंनी याप्रकरणी सत्य निवडणुकीपूर्वी बाहेर येईल असं वक्तव्य केले होते. त्यामुळे या प्रकरणी संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र आमदार लंके यांनी कोणत्याही जमिनीचे अधिग्रहण होणार नसल्याचं सांगितलं आहे. जमिनीच्या अधिग्रहणावरून खासदार विखे म्हणाले होते कि, के के रेंज संदर्भात विस्तारीकरण होणार की नाही हे निवडणुकीआधी कळेल. त्यामुळे पवार साहेबांवर विश्वास ठेवायचा का मोदी साहेबांवर? याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे,
असं सूचक वक्तव्य विखे यांनी केलं होत. याबाबत स्पष्टीकरण देताना लंके यांनी म्हटले कि, ‘के. के. रेंज प्रकरणी कोण राजकारण करतंय हे मला माहिती नाही. मात्र शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढा उभा केला आणि त्यात आम्ही जिंकलो आहे’, असं म्हणत लंके यांनी खासदार सुजय विखेंना टोला लगावला आहे.
त्या जमिनीचे मुल्यांकन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र तो निर्णय त्यांनी मागे तर घेतलाच शिवाय शेतकऱ्यांचं क्षेत्र न जाण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने देखील शेतकऱ्यांनी घाबरण्याचं काही कारण नसल्याचं सांगितलं आहे, असंही लंके म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved