Ahmednagar News : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा खरा सन्मान भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्येच झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील उपेक्षित समाजाला न्याय देणा-या योजना सुरु करुन वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम केले आहे.
त्यामुळेच लहुजी सेनेचे सर्व कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रचार यंत्रणेत काम करत असल्याची माहीती लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुशील शिंदे तसेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नगर येथे महायुतीचे उमदेवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ खंदारे यांनी विविध भागांमध्ये दौरा करुन, मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर निवडणूक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी लहुजी सेनेची भूमिका स्पष्ट केली.
महायुतीच्या उमेदवाराला लहुजी सेनेचे पुर्ण समर्थन असून, महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करण्यासाठी लहुजी सेनेने सुध्दा जबाबदारी स्विकारली असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या कॉंग्रेस पक्षाने या पुर्वी ७० ते ८० वेळा घटनेमध्ये बदल केला, त्यामुळे भाजपावर आरोप करण्याचा त्यांना कोणताही आधिकार नाही. संविधानाचा खरा सन्मान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातच होवू शकला असे स्पष्ट करुन,
लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचा निर्णय, इंदु मिल येथील डॉ.आंबेडकरांचे स्मारक तसेच वस्ताद लहुजींच्या स्मारका करीता ५ गुंठे जमीन आणि निधीची उपलब्धता करुन, देण्याच महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यामुळेच लहुजी सेनेने महायुती सरकारच्या निर्णयांचे स्वागत केले आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूतीवर लहुजी सेनेचे सर्व कार्यकर्ते सक्रीयेपणे प्रचारात सहभागी झाले असून, युतीचे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी सांगितले.