काँग्रेसचे आज जिल्हाभर धरणे आणि निदर्शने

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- नगर | मोदी सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेल्या कायद्यांना विरोध करण्यासाठी, हे कायदे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी (२ ऑक्टोबर) गांधी जयंती दिनी काँग्रेसतर्फे जिल्हाभर धरणे व निदर्शने करण्यात येणार आहेत.

जिल्हा काँग्रेस आणि शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने जिल्ह्याच्या मुख्यालयी नगर मार्केट कमिटीच्या आवारामध्ये गांधी जयंतीच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता धरणे

व निदर्शने करीत काँग्रेसतर्फे शेतकरी व कामगार बचाव दिवस साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली.

गांधी जयंती असल्यामुळे वाडिया पार्क येथील गांधीजींच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात येणार आहे. शेतकरी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या आणि काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलने होणार आहेत.

राहता, कोपरगाव, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, नगर शहर, नगर तालुका, श्रीगोंदे, शेवगाव, नेवासा, पाथर्डी, कर्जत, जामखेड, राहुरी,पारनेर आदी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी हे आंदोलन पार पडणार आहे.

अहमदनगर Live24 

च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24