अहमदनगरमधील वाहन चोरीचे परराज्यात कनेक्शन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे घडताना दिसतात. चोर्‍या, घरफोड्या, दरोडे, रस्तालुटीच्या घटना घडत आहेत. पोलीस प्रशासन यावर जरब बसविण्याचे कार्य करत आहे.

वाहन चोरीचे देखील खूप प्रकार नगरमध्ये घडत असतात. नुकताच तोफखाना पोलिसांना एक चारचाकी चोरटा हाताला लागला. त्याने नगर शहरातील निर्मलनगर रोडवरील शिरसाठ मळ्यातून एक कार चोरली होती. पोलिसांनी ती कार जप्त केली आहे. दाऊद मंजूर शेख (वय- 55 रा. बुलढाणा) असे या चोरट्याचे नाव आहे.

त्याने चोरलेल्या वाहनांची विक्री परराज्यात होत असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. सुरूवातीला तीन दिवस पोलीस कोठडीत असलेला शेख आता न्यायालयीन कोठडीत आहे.

परंतु, नगर शहरातून किती वाहने चोरली याबाबत अधिक माहिती तो पोलिसांना देत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरी केलेल्या कारसह अटक केली होती.

त्यांनी शेख याला पुढील तपासकामी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याने शहरातून किती कार चोरल्या याबाबत चौकशी केली असता, एकच कार चोरल्याची कबुली त्याने दिली.

परंतु, त्याने अधिक कार व इतर वाहने चोरल्याचा संशय पोलिसांना आहे. चोरीची वाहने विकत घेणारा, ती वाहने परराज्यात विक्री करणार्‍या व्यक्ती पडद्याआड आहे. याबाबत शेख याने पोलिसांना त्यासंदर्भात माहिती दिली नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24