अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : गोरक्षनाथ गडाच्या पायथ्याशी पर्यटन स्थळाची निर्मिती, साडेचार कोटींचा निधी मंजूर, विखे-कर्डीले जोडगोळीची माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेत सध्या विविध विकासकामांचा धडाका सुरू आहे. खा.सुजय विखे व माजी मंत्री शिवाजी कर्डीले हे सध्या अनेक कांचनहे लोकार्पण किंवा इतर अनेक विकासकामे करताना दिसून येत आहेत. यामध्ये राजकीय भवितव्य किंवा इतर काही राजकीय गणिते असली तरी होणाऱ्या विकासकांवर मात्र जनता खुश दिसत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पवित्र तीर्थस्थळ गोरक्षनाथ गड आहे. आदर्श गाव मांजरसुंबा हे नगर शहरापासून अवघे १५ किलोमीटरवर असून येथे गोरक्षनाथ गड असल्याने भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. या पर्यटकांची सोय व्हावी त्याचप्रमाणे वन विभागाच्या जागेवर पर्यटन स्थळाची निर्मिती व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी दिली.

यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये मंजूर झाले असून मांजरसुंबा गावाला पर्यटनातून चालना मिळेल व ते एक पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाईल अशीही माहिती त्यांनी दिली. मांजरसुंबा येथे विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच साखर व दाळवाटप कार्यक्रम खा.डॉ.सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

खा.डॉ.सुजय विखे यांनी विरोधकांवर साधला निशाणा

सध्या सुरु असणाऱ्या साखर वाटपावरून खा. विखे यांच्यावर राजकीय आरोप होत आहेत. याचाही समाचार यावेळी खा.विखे यांनी घेतला. ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गावच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना मंजूर करून आणल्या. नवीन एमआयडीसी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. पुढील एक वर्षांत सुमारे पाच हजार युवकांना रोजगार उपलब्ध होईल. आम्ही साखर वाटून मते मिळवणारे लोक नाहीत.

५० वर्षाच्या काळामध्ये विखे परिवाराने नेहमीच जनतेच्या प्रश्नावर काम केले असल्याने जनतेशी नाळ जुळलेली आहे. आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत असे विखे म्हणाले. यावेळी यावेळी सरपंच मंगल कदम, उपसरपंच जालिंदर कदम, शंकर कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विवेक नाईक, विजय शेवाळे, ताराचंद डोंगरे आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office