नगर-औरंगाबाद महामार्गावर कंटनेर चालकास लुटले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर परिसरात भारत पेट्रोल पंपासमोर बुधवारी कंटेनर चालकाला लुटण्यात आले. औरंगाबादकडून मुंबईला जाणारा

कंटेनर (एमएच ४६ बीई ६३५४) बिघडल्याने चालक अमिरऊल विश्वास (कोलकाता) याने भारत कंपनीच्या सागर कन्स्ट्रक्शन पेट्रोल पंपासमोर कंटेनर उभा केला व केबिनमध्ये तो झोपला.

पहाटे ४ च्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून आलेल्या तिघांनी कंटेनरमधील डिझेल चोरले. चालकास जाग आल्याने त्याने आरडाओरड केल्यावर चोरांनी डिझेल घेऊन तेथून पोबारा केला.

त्यांनी आपल्या इतर साथीदारांना फोन करून ही घटना सांगितली. नंतर मोटारसायकलीवर तिघेजण कंटेनरचालकाजवळ आले. कंटेनरची काच फोडून केबिनमध्ये प्रवेश करून त्यांनी चालकास मारहाण करत आठ हजार रुपये हिसकावून घेतले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24