कंटेनर- व्हॅनचा भीषण अपघात… वेळीच व्हॅनचे दरवाजे तोडले अन्यथा….?

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  भरधाव वेगात मनमाडकडे जाणाऱ्या कंटेनरने मुंबईकडे जाणाऱ्या व्हॅनला जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भिषण होता की अपघात होताच व्हॅन पेटली व व्हॅनमधील सहा जखमींना जवळच असलेल्या

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजे तोडून बाहेर काढले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. ही घटना कोपरगाव शहरालगत नगर-मनमाड महामार्गावर पुणतांबा चौफुलीवर घडली.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या अपघातात एकूण सहाजण जखमी झाले असूनयापैकी चार महिला गंभीर जखमी आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, पुणतांबा चौफुलीवर (एचआर ५५ एएफ ८२४३) हा कंटेनर नगरहुन मनमाडकडे भरधाव वेगाने जात असताना

(एमएच ०३ एई ५२७७) या मुंबईकडे जात असलेल्या मारुती व्हॅनला जोराची धडक दिली. यात साहेबराव लक्ष्मण बेंदुरे, रोहिदास दशरथ पानमंद, स्मिता संदीप मुंडारे, सुनिता संतोष पानमंद, अनिता राम साळुंके, संगिता साहेबराव बेंदुरे (सर्व रा. दहिसर, मुंबई) हे जखमी झाले.

यातील चार महिला गंभीर जखमी असून अपघात होताच कंटेनर चालक महंमद युसूफ अली (रा. रामपूर, ता. रुडकी, हरिद्वार, उत्तराखंड) हा पळून गेला आहे.

अपघात होताच जवळच असलेल्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत, गाडीचे दरवाजे तोडीत जखमींना बाहेर काढले. गाडीने पेट घेतला होता. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.