अहमदनगर लाईव्ह24 टीम/ नेवासा :- तालुक्यातील कुकाणे-तरवडीदरम्यान वरखेड-माका रस्त्याच्या कामातील पुलाच्या भिंतीला धडकून झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी बाळासाहेब लक्ष्मण देशमुख (टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) व अमर सुरेश देशमुख (प्रगती कन्ट्रक्शन, पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ठेकेदार, कंपनी व बांधकाम विभागाच्या विरोधात अलीकडच्या काळात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. या अपघातात तेलकुडगाव येथील राहुल राजू सरोदे या तरुणाचा बळी गेला होता.
३१ जानेवारीला ही घटना घडली. या प्रकरणी पोपट रामभाऊ सरोदे यांनी फिर्याद नोंदवली. सार्वजनिक बांधकामच्या वतीने राज्यमार्ग ५२ ते गेवराई, शिरसगाव, माका, देडगाव, जेऊर हैबती, कुकाणे मार्गाचे काम सुरू आहे.
पुलाचे काम सुरू असताना ठेकेदाराने जो पर्यायी रस्ता काढला, त्या ठिकाणी दिशादर्शक किंवा सूचना फलक आढळला नाही. अपघात घडू नये, म्हणून आवश्यक उपाययोजना न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com