ह्या’ तालुक्यात प्रशासन व जनतेतील समन्वयाने करोनावर नियंत्रण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :अहमदनगरमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातही याचे लोन पसरत चालले आहे. परंतु प्रशासन व जनतेतील समन्वयाने करोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते याचा धडा शेवगाव तालुक्याने दिला आहे.

शेवगावचे तालुका प्रशासन, आरोग्य विभाग, स्वच्छता कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी-कर्मचारी आणि जनता यांच्या समन्वयामधून या ठिकाणी कोरोनाला अटकाव घालण्यात आला आहे.

याचा परिणाम म्हणजे आज अखेर करोना सुरू झाल्यापासून तालुक्यातील दोनशे बत्तीस जणांचे स्राव तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. यापैकी ९७ जणांचे श्राव शेवगाव च्या कोविड केअर सेंटर मध्ये घेऊन नगरला पाठविण्यात आले होते.

त्यातील २१ जण बाधित आढळले होते. त्यापैकी १४ जण बरे होऊन स्वगृही पाठविण्यात आले आहेत . तर ७ जण नगर येथे ते उपचार घेत आहेत.

तसेच आज २९ जणांचे अहवाल प्रलंबित असून सध्या ते सर्व जण येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूलमधील विलगीकरण कक्षात आहेत . तालुक्यातील बाधितांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही.

या काळात आरोग्य कर्मचाऱ्याच्या ६२३ जणांच्या पथकांनी तालुक्यातील ११२ गावातून सारीच्या सर्दी पडश्याच्या सर्वेक्षणाच्या चार फेऱ्या पूर्ण केल्या असून

या पथकांनी सर्वेक्षण प्रसंगी आढळलेल्या ७३५ आजारी व्यक्तींना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन उपचार केले आहेत. तालुक्यातील सर्व गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली करोना ग्रामसुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात आल्या असून

या समित्या कोणासही परस्पर गावात जाऊ देत नाहीत. आज अखेर ८४ गावात परगावातून आलेल्या २ हजार ४६१ व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आज अखेर १८८ व्यक्ती गावोगावच्या विलगीकरण कक्षात आहेत.

तहसीलदार अर्चना पागिरे, आरोग्य अधिकारी डॉ .सलमा हिराणी,पोलीस उप अधीक्षक मंदार जवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,

ग्रामीण आरोग्य केंद्राचे डॉ . रामेश्वर काटे आणि तालुक्यातील आशा, अंगणवाडी सेविका, कंत्राटी व कायम आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी या सर्वानी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24