अहमदनगर बातम्या

मोकाटे प्रकरणात कर्डिलेच मास्टरमाईंड; ‘या’ नेत्यांचा आरोप

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे आणि त्यांच्या परिवाराला जीवनातून, राजकारणातून उठविण्याचा प्रयत्न सध्या चालविला आहे.(Ahmednagar Politics) 

मोकाटे प्रकरणात शिवाजी कर्डिलेच मास्टरमाईंड आहेत, असा आरोप नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला. मोकाटे यांच्याविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे.

नुकतेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी मोकाटे यांची जेऊर गटातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आरपीआयच्यावतीने जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांच्या पुतळ्यास जोडे मोरो आंदोलन करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर नगर तालुका महाविकास आघाडीच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले,

शरद झोडगे, बाळासाहेब हराळ, संदीप गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, बाबासाहेब गुंजाळ,

माजी सभापती रामदास भोर, रवींद्र भापकर, व्ही. डि. काळे, गुलाब शिंदे, केशव बेरड, प्रकाश कुलट, प्रविण गोरे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके म्हणाले, माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांच्या काळात सुसंस्कृत आणि विकासाचे राजकारण व्हायचे, परंतु आता वैयक्तिक आणि दुसर्‍या आयुष्यातून उठविण्याचे राजकारण सुरू आहे.

विरोधकांकडे काहीच मुद्दा नसल्याने दुसर्‍याचे आयुष्य उध्दवस्त करण्याचे काम विरोधक करत आहेत. संदेश कार्ले म्हणाले, गोविंद मोकाटे यांची उमेदवारी जिल्हा प्रमुख प्रा. गाडे यांनी जेऊर गटातून जाहीर केली.

त्यामुळे त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करायला लावले. तुम्हीही उमेदवार जाहीर करा. समोरा समोरा लढाई होवू द्या, संसार उध्दवस्त करण्याचे काम करू नका.

अन्यथा आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल असा इशारा दिला. यावेळी बाळासाहेब हराळ, राजेंद्र भगत, शरद झोडगे, केशव बेरड, बाबासाहेब गुंजाळ यांनीही विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office