कोरोना त्यात अतिवृष्टीने हतबल झालेला शेतकरी आता जनावरांचा आजारामुळे संकटात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- आधीच कोरोना त्यात अतिवृष्टीने हतबल झालेला शेतकरी स्वतःला सावरत असताना आता जनावरांचा आजाराही डोके वर काढू लागल्याने पशुपालकांपुढे नवी समस्या उभी राहत आहे.

कोरोनामुळे घटसर्प अन् फऱ्या रोगाचे लसीकरण होऊ शकले नाही. आता तालुक्यातील सुमारे ८० हजार जनावरे लाळ्याखुरकत रोगाच्या लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात पशुवैद्यकीय विभागामार्फत पावसाळा सुरु होण्यापुर्वी घटसर्प आणि फऱ्या रोग येऊ नये म्हणून लसीकरण केले जाते.

मात्र तालुक्यात कोरोनामुळे हे लसीकरण झालेले नाही.आता पावसाळ्यानंतर लाळ्या खुरकत रोगाची शक्यता असल्याने सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात या रोगासाठी लसीकरण केले जाते. श्रीरामपूर तालुक्यात शासकीय आकडेवारीनुसार सुमारे ८० हजार गाय,म्हैस,बैल आदी मोठी जनावरे तर १२ हजार शेळ्यामेंढ्या आहेत.

लाळ्याखुरकत लस ही मोठ्या जनावरांना दिली जाते.म्हणजेच ८० हजार जनावरांना लस द्यावी लागेल.मात्र त्यासाठी मोठी यंत्रणा लागणार आहे. श्रीरामपुर तालुक्यात तालुका पशुउपचार केंद्रात तिन डॉक्टर कार्यरत आहेत. तर ग्रामीण भागात श्रेणी एक दर्जाचे कुरणपूर, ऊक्कलगाव,

निमगाव खैरी असे तीन तर श्रेणी दोन दर्जाचे मातापुर, मालुंजा, नाऊर, टाकळीभान, पढेगाव,कारेगाव आदी सहा दवाखाने आहेत. या केंद्रात प्रत्येकी एक पशुवैद्य कार्यरत आहेत.मात्र कारेगावची जागा रिकामी आहे.त्यामुळे सध्या तालुक्यात अकरा पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

त्यामुळे लसीकरण मोहीमेसाठी खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात येणार असुन प्रत्येक गावात एका खाजगी डॉक्टरांची लसीकरणापुरती नियुक्ती करण्याबाबत वरीष्ठ कार्यालयाकडे प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. लसीकरण झाल्यानंतर प्रत्येक जनावराला बिल्ला मारुन ऑनलाईन नोंदही करायची आहे.

लंपी स्कीन आजाराची राज्यात सुरुवात झाली असुन विदर्भ,मराठवाड्यात हा आजार आढळला असुन नगर जिल्ह्यात गोदावरी काही भागात या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत.या आजारात जनावरांच्या अंगावर गाठी येतात,ताप येतो,तोंडात फोड येतात.याबाबत शासनाचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24