अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा वेग काहीसा मंदावला आहे. त्यातच जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. दरम्यान नेवासा तालुक्यात तीन दिवसांत 6 संक्रमित आढळून आले.
काल गुरुवारी तालुक्यात एकही संक्रमित आढळून आला नाही. तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 2921 झाली आहे. मंगळावरी सोनई, घोडेगाव, भेंडा खुर्द येथे प्रत्येकी एक असे तिघे संक्रमित आढळून आले होते.
बुधवारी माका येथे एक तर घोडेगाव येथे दोन असे तिघे संक्रमित आढळले. काल गुरुवारी तालुक्यात एकही संक्रमित आढळून आला नाही.
अशाप्रकारे मागील तीन दिवसात तालुक्यातील पाच गावातून केवळ सहा करोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असले तरी नागरिकांनी नियमांचे पालन करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.