अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : कोरोनाने संबंध देशभर धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे अनेक धार्मिक सण – उत्सवांवर पाणी फेरले गेले. यान्हाची आषाढी वारीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.
त्याच प्रमाणे काल झालेल्या गुरुपौर्णिमेवरही याचा परिणाम झाला. नेवासे तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड व टोका येथे हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडणारा सोहळा काल भक्तांविना पार पडला. देवगडचे मंदिर बंद असल्याने दर्शनही बंद होते.
पहाटे ४ वाजता भास्करगिरीबाबांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांसह श्रीसमर्थ सदगुरु किसनगिरीबाबांच्या समाधी, तसेच पंचमुखी सिद्धेश्वर शिवलिंगाची पूजा, आरती झाल्यानंतर गुरूवंदन करण्यात आले.
सद्गुरू श्रीबालब्रह्मचारी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत टोका येथे साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. महामारी संपवण्यासाठी वेदमंत्राच्या जयघोषात होमहवन करण्यात आले. पौरोहित्य गंगापूर येथील आचार्य सोनूगुरू देवळे, किरणगुरू देवळे व नितीनगुरू धुमाळ यांनी केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews